MPSC क्षेत्राकडे येण्याआधी जाणून घ्या काही गोष्टी

स्पर्धापरीक्षा म्हटलं कि आजकाल दोनच नावं डोळ्यांसमोर येतात .

MPSC & UPSC याच कारण हे आहे कि या दोन क्षेत्रांबाबत अलीकडच्या काही वर्षात खूप मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये जागरुकता निर्माण झाली आहे . UPSC मध्ये मराठी माणसांचा टक्का कमी आहे तो वाढला पाहिजे या भावनेतून लोकांना जागरूक करण्या बरोबरच UPSC काय कुणीही करू शकतो असा एक (चुकीचा) संदेश जाणून बुजून या क्षेत्रातील शिक्षण देणाऱ्या धंदेवाईक लोकांकडून पसरवला जात आहे.

जस काही UPSC परीक्षा म्हणजे खेळ आहे आणि तो कुणी पण जिंकू शकतो.

खेळ सगळेजण खेळू शकतात ,पण सगळेच कसं जिंकू शकतील ?

बरे MPSC बाबत मराठी टक्का अशी काय बाब येत नाही मग इथे या लोकांनी दुसरी कारणे सांगून मुलांना या क्षेत्राकडे वळायला व आपल्या CLASSES कडे खेचायला सुरुवात केली . उदा.

1] MPSC मध्ये TOPPER ५५/६० टक्के चा असतो त्यामुळे MPSC पास होणे काही जास्त अवघड नाही

२] पदवीला तुम्हाला किती टक्के असतील (कमी) याचा काही संबंध नाही तुम्ही MPSC पास होऊ शकता

३] लाल दिव्याची गाडी सरकारी नोकरी सुरक्षित करिअर आणि सरकारी अधिकार्याचा रुबाब मिळवणे कुणालाही शक्य आहे

४] ENGINEER DOCTOR बनू शकला नाहीत 10 वी / १२ वी ला चांगले मार्क घेऊ शकला नाहीत म्हणून काय झाल ? DY.collector DYSP बनून त्यांच्या पेक्षा मोठे बना

५] दुसरी मुले पास होऊ शकतात मग तुम्ही पण पास होऊ शकाल

६] ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा टक्का कमी आहे त्यांना शिक्षणाच्या जास्त संधी उपलब्ध नसतात त्यांनी जरूर MPSC/UPSC कराव आणि ग्रामीण टक्का वाढवावा .

अशी शेकडो कारणे हे लोक तुम्हाला देत असतात आणि तुम्हाला इकडे खेचत असतात …

वरती दिलेली कारणे काही प्रमाणात खरी मानली तरी ती सरसकट सर्वाना कशी काय लागू होतील?वस्तुस्थिती काय आहे? कुणी सांगत नाही .. आपण बघणार आहोत यातील नेमकी कायवस्तुस्थिती आहे ते आणि MPSC/UPSC करण्याआधी काय गोष्टी बघाव्यात आपल्या मधल्या? काय कराव लागत? आणि काय करू शकतो ? याचा एक दृष्टीक्षेप .

सर्व प्रथम एक लक्षात घ्या या स्पर्धा परीक्षा आहेत आणि यामध्ये तुम्हाला जिंकायचं असेल तर इतर विद्यार्थ्यांपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागेल बस हे एकमेव सूत्र आहे.

तुम्ही ज्या कुठल्या यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे INTERVIEW पाहता त्यांचे अनुभव ऐकून प्रेरित होता तेंव्हा त्यांनी केलेला अभ्यास त्यांनी केलेले कष्ट या गोष्टी पाहायला हव्यात. हे विद्यार्थी जे अधिकारी बनले ते काही एका रात्रीत अभ्यास करून बनलेले नसतात . त्यामागे खूप दिवस महिने वर्ष अभ्यास केलेला असतो .

एक उदाहरण पाहूया , ग्रामीण भागातून अत्यंत गरीब कुटुंबातील विद्यार्थी रमेश घोलप IAS बनून आज प्रशासनात चांगले आपले काम करत आहे . तुम्ही फक्त त्याच एवढच पाहिलं कि तो ग्रामीण भागातून आलाय आणि गरीब होता, पण हे माहिती आहे का.

  1. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा त्याने १२ वी ला विज्ञान शाखे मध्ये ८८% गुण मिळवले होते.
  2. आणि स्वताची इच्चा नसताना देखील केवळ घरची गरिबी दूर करायची यासाठीम्हणूनD.ed ला प्रवेश घेतला .
  3. आणि प्रतिकूल आर्थिक परिस्थिती मधेही कुठलाही class न लावता त्याने स्व बळावर MPSC आणि UPSC दोन्ही मध्ये यश मिळवले.

(MPSC मध्येआजपर्यंतचा सर्वात जास्त गुणांचा रेकॉर्ड रमेश घोलप च्या नावावर आहे )

पुन्हा एकदा वरची ३ वाक्ये काळजी पूर्वक वाचा.

काही वेळा वाक्ये ऐकून ऐकून त्यातला अर्थच विसरायची सवय आपल्याला असते .

या ३ वाक्या मध्ये रमेश घोलप चे आयुष्याचे सर्व रंग लपलेले आहेत .

रमेश घोलप च एक वाक्य आहे कि “ गुणवत्ता हेच भांडवल असते”

समर्पण. १२ वी ला जिथे कि त्याला तो नुसतं पास झाला असता तरी ग्रामीण भागात त्याच कौतुक झाले असते तिथ त्याने सर्व अडचणी झेलत त्यातून मार्ग काढत अभ्यासामध्ये कुठेच खंड पडू दिला नाही अभ्यास करत राहिला आणि एवढे गुण मिळवले . प्रतिकूल परिस्थिती मधेही अभ्यास पूर्ण करायची त्याची जिद्द आधीपासूनच त्याच्याकडे होती . म्हणजे ज्या वयात कॅरिअर बद्दल पुढे काय हे माहिती नाही तरी सुद्धा समोर जे आहे आधी त्यात यश मिळवू, समोर जे आहे आधी ते काम तो अभ्यास पूर्ण करू.अभ्यासाबाबत इतके समर्पण (DEDICATION) देण्याची त्याची तयारी तेंव्हाही होती .

संयम.वेळ प्रसंगी नेमक काय महत्वाच आहे त्यासाठी काय केल पाहिजे ही समज आणि स्वतःच्या इच्छांचा तात्पुरता त्याग करून आपल्या स्वप्नपूर्ती साठी संयम बाळगून नेटाने काम करत राहणे हा स्वभावगुण

जिद्द. कुठलीही माहिती नसताना शून्या पासून सुरुवात करून , कुठलाही class न लावता सर्व गोष्टी स्वतः समजून घेऊन स्वतः अभ्यास केला .दिवस रात्र वेळ न पाहता जिथे जागा मिळेल तिथे अभ्यास केला एकदा आलेले अपयश पचवून पुढेही त्याच जिद्दीने अभ्यास करत राहिला ,तयारी दरम्यान सामाजिक बांधिलकी कुठेच सोडली नाही मित्र, परिवार सर्वांची कामे करत त्यांच्यासाठी वेळ देत अभ्यास केला. आलेल्या सर्व अडचणींना झेलत त्यांच्यावर मात करत त्याने शेवटी आयुष्याचे पहिले धेय्य मिळवले .

आपल्या घरात सर्व गोष्टी जागेवर मिळत असताना आपण अभ्यास नाही करू शकत तर मग इथे पुण्यात येऊन घाणेरड्या रूम राहुन जिथे ढेकुन नावाचे प्राणी तुमच्यावर प्रचंड प्रेम करत तुमच्यासोबत वस्तीला असतात ,जिथे हवा येत नाही ,प्रकाश येत नाही अशा  रूम मध्ये अशा  कोंदट जागेत राहून, आणि मेस वरचे अतिशय खालच्या दर्जाचे बेकार अन्न ग्रहण करून असले so called struggle करून आपण १०/१२ तास अभ्यास करू हे असले फाजील स्वप्न पाहण्यापेक्षा एकदा स्वतःला तपासा .

 

या सर्व गोष्टी सांगून तुम्हाला एवढाच जाणीव करून द्यायची आहे कि यशस्वी विद्यार्थ्याचे त्याने घेतलेले कष्ट तुम्ही ओळखा आणि मग स्वताला प्रश्नविचारा आपली किती तयारी आहे या सर्व गोष्टी करण्याची?उगीच जिद्दीने पेटून एक दोन दिवस किंवाआठवडाभर अभ्यास करून ती आग विझून जाणार आहे का ?

हे अशी करिअर ची स्वप्ने अभ्यासाची स्वप्ने  आपण याआधी पहिली होती का कधी?

१० वी ला असताना चांगला अभ्यास करून जास्त मार्क घेण्याच स्वप्न

किंवा १२ वी ला चांगला स्कोर करण्याच स्वप्न ?

CET ला असताना त्यामध्ये  स्कोर करण्याच स्वप्न ?

ही स्वप्ने पूर्ण झाली का ?

झाली नाहीत तर का झाली नाहीत याची काय कारणे आहेत . स्वतःचस्वतःला खर बोला खरी उत्तरे द्या आपलीच फसवणूक करू नका

आर्थिक परिस्थिती मुळे अभ्यासावर परिणाम झाला असेल तर मान्य.

पण  आपल्यालाच अभ्यासाचे गांभीर्य नव्हते, तेंव्हा सगळ काही मिळत होत, पुस्तके/वह्या/अभ्यासिका खायला प्यायला सगळ काही मिळत असताना आपण अभ्यास केला नाही आणि म्हणून मार्क कमी आले असतील तर इथे तर अभ्यास रोजच्या रोज म्हणजे खरच रोजच्या रोज वर्षभर करावाच आहे . मूड नुसार अभ्यास करून इथे पास नाही होता येत . इथे जे कष्ट लागणार आहेत त्यात कुठेच कामचोरी  करता येत नाही नाहीतर पास होणार नाही .

दिवसाचे कमीत कमी ६/८ तास अभ्यास हा करावाच लागतो तो कुणालाच चुकणार नाही आणि तो अभ्यास म्हणजे असा नाही उगी पुस्तक समोर घेऊन बसलात आणि काम झाल . हे सर्व अतिशय गंभीर पणे कराव लागणार आहे

पुण्यात class लावला म्हणजे class वाले तुम्हाला अधिकारी बनवूनच बाहेर काढणार आहेत हा गैरसमज काढून टाका डोक्यातून , इथे काय हाल आहेत हे विचारा class केलेल्या विद्यार्थ्यांना . पुण्यातीललोकल ची मुले इथे MPSC चा class नाही लावत लावलाच तर UPSC लावतील अशी अवस्था आहे .

t

घरी राहून घरचे खाऊन पिऊन अभ्यास करायला लवकर आपण तयार नाही झालो आणि मग आता असं काय होणार ज्यामुळे तुम्ही एकदम अचानक तुमच्यात असा काय बदल घडणार आहे ज्यामुळे तुम्ही एकदम सर्व गोष्टी सोडून फक्त अभ्यासच करणार आहात ? विचार करा

t

उगी सगळे उठून पुण्याला जात आहेत म्हणून आपण पण त्यांच्या मागे जायचं का?

t

ओढून ताणून स्वतःवर MPSC च स्वप्न लादून घेतलं आहे का?

t

अभ्यासाची किती आवड आहे ,MPSC पास होण्याची गरज तुम्हाला किती आहे ??काही वेळा गरज माणसाला घडवत असते आणि गरज किंवा आवड नसेल तर आपण पुस्तकाचं एक PAGE सुद्धा वाचणार नाही.

t

आपण कधी कुणाला कसली मदत केली आहे का ? आपल्या मनात समाजातील लोकांबद्दल कितपत आदर आहे ?, ज्यांची आपली कसली ओळख नाही अशा शेकडो लोकांसाठी उद्या अधिकारी म्हणून दिवसातील १०/१२ तास आपली काम करायची तयारी आहे का?

  • कारण जर हि तयारी असेल तरच १०/१२ तास अभ्यास करण्याचे बळ मिळेल .
  • आपण कितपत आपल्या कामाला प्राथमिकता देऊ शकतो ?आपला स्वभाव तपासून पहा , वडिलांनी दोन शब्द बोललं किंवा मित्र मैत्रीण नाराज झाला म्हणून मला टेन्शन आलंय माझा अभ्यास नाही होणार आज , आज ब्रेक घेतो , उद्या पासून सुरु करतो असं म्हणणारे असाल तर या क्षेत्राकडे अजिबात येऊ नका कारणMPSC मध्ये इतके चढ उतार आहेत, इतके टेन्शन चे किंवा नाउमेद करणारे प्रसंग येतील त्यांना बाजूला ठेवून अभ्यास सुरूच ठेवावा लागतो दुर्दैवाने हे सर्वाना जमत नाही आणि इथेच त्यांचा नकारात्मक निकाल लागलेला असतो .
  • MPSC मध्ये यशस्वी झालेले विद्यार्थी हे २/३ वर्षांपासून अभ्यास करणारे असतात पण अभ्यासाचे सातत्य असते म्हणून ते पास होतात यामध्ये त्यांच्या कलाससेस चा संबंध मुलाखती ची तयारी या बाबतच महत्वाचा ठरतो.  (दुर्दैवाने त्यालाहि फीस भरावी लागते , करोडो रुपयाचे उत्पन्न असलेले पुण्यातील MPSC classes वाले  मुख्य परीक्षा पास झालेल्या काही मोजक्या विद्यार्थ्यांकडून सुद्धा पैसे कमवणे सोडत नाहीत ) क्लास मध्ये शिकवले जाणारे काही जे असेल ते तुमच्या लक्षात २/३ वर्ष पर्यंत राहू शकते का? हे पुण्यातील MPSC चे CLASSES तुम्हाला फक्त या प्रवाहात आणून सोडतात बाकी तुम्हीच सर्व करता आणि शेवटी आपले संस्कार असे आहेत कि यशस्वी झाल्यावर आपण सगळंच क्रेडिट त्यांना देऊन टाकतो .
  • १०,००० विद्यार्थी पुण्यात चालू वर्षी MPSC चा क्लास करत असतात
  • ४०,००० विद्यार्थी जुने (जे MPSC मध्ये  रंजले गांजलेले) पुण्यात इकडे तिकडे अभ्यास करत बसलेले असतात.
  • सरासरी आकडेवारी पहिली तर पूर्ण राज्यातून MPSC साठी ३,५०,००० विद्यार्थी अर्ज करतात३००० विद्यार्थी PRELIMS पास होतात १२०० विद्यार्थी MAINS पास होतात आणि त्यातील २०० विद्यार्थी अधिकारी बनतात.
  • सांगण्याचे तात्पर्य हेच आहे कि जर पुण्यात येऊन फीस चे ५० हजार आणि राहायचे १ लाख (वर्षाला) खर्च करणाऱ्या ५० विद्यार्थ्या पैकी ४९ विद्यार्थी हे आयुष्यात एकदा हि PRELIMS सुद्धा जर पास होत नाहीत तर इथे येऊन तुम्ही अजून काय दिवा लावणार आहात .
  • वस्तुस्थिती काय आहे  आणि काय कराव लागेल हे इथ आम्ही सांगत आहोत .
  • विद्यार्थ्यांनी आपली आधी स्वतःची अभ्यास करण्या बाबतची औकात तपासून पहावी खरंच आपण एवढा अभ्यास करू शकतो का ते एकदा तपासून पहा , इथे तुम्ही हुशार नसाल तरीचालेल पण कष्टाळू असलंच पाहिजे , कष्टाळू म्हणजे काही खड्डे खणायलां नाही जायचं, एक वेळ ते सोप्प आहे पण दिवस रात्र मन लावून अभ्यास करण्यासाठी खूप मन घटट हवं .
  • स्वतःच्या बाबत या गोष्टी तपासून घ्या उगीच स्वप्न पाहावं मोठं असं म्हणून चालत नसते त्या स्वप्नपूर्तीसाठी लागेल ती सर्व मेहनत करावी लागते . उगी बघू तरी करून जमतंय का या तुमच्या हौसेखातीर पुण्यातील कलाससेस च्या जाहिराती ना बळी पडून उगी तोंड वर करून इथे येऊन आपल्या आई वडिलांचे कष्टाचे पैसे उडवू नका . आज घडीला त्यांना तुम्ही पैसे कमवून  देऊ शकत नसाल तर कमीत कमी त्यांचे पैसे उधळू तरी नका .
  • स्वतावर विश्वास असेल तर अभ्यास कुठेही होईल . MPSC पास झालेला विद्यार्थी स्वतःच्या कष्टाने पास झालेला असतो , रात्र दिवस अभ्यास करून तो हे यश मिळवतो. तुम्हाला पुण्यातील CLASSES च्या शिकवण्या बद्दल खरी परिस्थिती जाणून घ्यायची असेल तर त्या विद्यार्थ्याला विचारा जो नापास झाला आहे अजूनही तयारी करतो आहे .जर नापास विद्यार्थ्याने हि तुम्हाला क्लास बद्दल चांगले सांगितले तर मग पुढे जा पण जाण्या आधी सांगितलेल्या सर्व गोष्टींचा विचार करा  विनाकारण जाहिरातींना बळी पडू नका आणि पैसे वाया घालवू नका जे काही करायचं आहे ते तुम्हालाच करायचं आहे अभ्यास तुम्हालाच करावा लागेल तुमच्या वाटेचे कष्ट तुम्हालाच घ्यावे लागणार आहेत आणि राहिला MPSC  मार्गदर्शन चा प्रश्न तर त्यासाठी आता भरपूर पर्याय उपलब्ध आहेत.
  • QUALITY GUIDENCE म्हणजे उच्च दर्जाचे मार्गदर्शनविद्यार्थ्यांनी मिळवावे आणि त्यासाठी पैसाच लागतो असं मुळीच नाही गरीब विद्यार्थ्यांना असं मार्गदर्शन मिळावे याबाबत DIAC आपले काम करत आहे.
  • एवढ सर्वकाहीसांगितल म्हणून DIAC JOIN करा अस आम्ही म्हणणार नाही . तो तुमचा निर्णय आहे आमच काम आम्ही करत आहोत तुमच काम आहे अभ्यास करायचं ते तुम्ही करा. उगीच भ्रामक स्वप्नांमध्येराहून महत्वाची वर्षे वाया घालू नका .स्पर्धा परीक्षा ची तयारी हा आयुष्याचा  एक भाग असू द्या करिअर  चा एक पर्याय म्हणून फक्त त्याकडे पहा, त्यालाच  आयुष्य बनवू नका . समाजसेवेसाठीप्रशासना मध्येच याव लागत अस काही नाही . त्यासाठी खूप पर्याय आहेत ते पण पहा मग . आणि सर्वात महत्वाचे म्हणजेआपले चालू असलेले शिक्षण किंवा नोकरी सोडून याच्या मागे लागू नका . आणि जर अजून शिकतच असाल तर करिअर चा backup plan तयार करत याची तयारी करा  . आणि पुण्याच्या classes वाल्यांच्या नादी नका लागू ५० हजार देऊन काय मिळते हे १०/२०जुन्या विद्यार्थ्यांनाविचाराज्यांनी तुमच्या आधी तिथ जाऊन वेळ आणि पैसा खर्च केलेला आहे .
  • BASIC माहिती / मार्गदर्शन मिळत असेल तर बिना class च MPSC पास होणे मुळीच अवघड नाही .

ONE SPECIAL SUGGETION

जर स्वतः च्या बाबतीत काही संभ्रम असेल आणि काय कराव हे काळातच नसेल तरी जिथे आहात तिथेच  अभ्यासाला सुरुवात करा आणि MPSC चा एक ATTEMPT देऊन पहा . पण उगाच द्यायचा म्हणून देऊ नका तुमच्यातील सर्व ताकद पणाला लावून , गंभीरतेने अभ्यास करा आणि परीक्षा द्या .. एकदा बघा स्वताला वेळ देऊन यामुळे तुमच्या क्षमता तुम्हाला कळतील आणि भविष्यातील योजना करायला तुम्हाला  हे आत्मपरीक्षण नक्कीच कामाला येईल आणि यात काही नुकसान होणार नाही . पण हा निर्णय घ्यायला जास्त वेळ घालवू नका . येणारी प्रिलिम्स मार्च / एप्रिल 2018 ला असेल.

DON’T GIVE UP ON A DREAM

JUST BECAUSE OF THE TIME IT WILL TAKE TO COPMLETE IT.

TIME WILL PASS ANY WAY.

एखाद्या आपल्या स्वप्नाला यामुळे सोडू नका देऊ कि ते पूर्ण करायला फार वेळ जाणार आहे

कारण वेळ हा कुठल्या न कुठल्या मार्गाने जातच असतो .