Select Page

Directors Message

DIAC – स्पर्धा परीक्षांमधील मुलांना Animations च्या माध्यमातून शिकवणारा संपूर्ण भारतातील आपला एकमेव क्लास आहे.
आज पर्यंत Animations चा वापर करून फक्त 10 वी १२ वीच्या मुलांना शिकवले जात असे परंतु स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना सुद्धा अशा माध्यमातून शिकवले तर जास्त फायदा होत असल्याचे दिसून आले. आणि मग असा फायदा हा कोणत्याही व्यावसायिक स्वरुपात बांधून न ठेवता समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना याचा फायदा पोहचेल
अशा पद्धतीने या DIAC Learning App ची रचना करण्यात आलेली आहे .

सध्या बाजारात खूप सारे असे app आहेत जे फ्री मध्ये उपलब्ध आहेत .त्यांच्या बद्दल मला नेहमीच आदर आहे. परंतु DIAC मध्ये ज्या पद्धतीच शिक्षण दिल जाते आणि ज्या माध्यमातून तुम्हाला विषय चांगल्या प्रकारे शिकवला जातो ती Technology खूप जास्त खर्चिक आहे हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे .

दहावी आणि बारावी चे ANIMATION ने शिकवले जाणारे ONLINE क्लास जिथे एका विषयासाठी २० ते २५ हजार रुपये घेतात. तिथे असेच सर्व विषय आम्ही ७५०० रुपयांमध्ये उपलब्ध करतो आहोत हि अश्यक्यप्राय वाटणारी गोष्ट आम्ही आज खरी करून दाखवली आहे .

पुढच्या ५ वर्षाचे ध्येय समोर ठेवून आम्ही फीस ची रचना केलेली आहे ज्यामुळे गरीबातल्या गरीब विद्यार्थ्याला सुद्धा हे Quality Education घेता यावे हा आमचा मूळ हेतू साध्य होतो आहे . ज्या प्रकारे तुम्हाला सर्व विषय उलब्ध करून देत आहोत त्यासाठी आमची टीम मागच्या एक वर्षापासून काम करत आहे .Lectures तयार करायचे, तर चांगलेच करायचे हे ध्येय नेहमी समोर ठेवून आम्ही काम केलेलं आहे. ३ वर्षा पासून मी विविध ठिकाणी विद्यार्थ्यांना हे मार्गदर्शन करतोय कि स्पर्धा परीक्षांच्या नादी लागून आयुष्याची महत्वाची वर्षे वाया घालवू नका .

करिअर कौन्सलिंग मध्ये मी विद्यार्थ्यांना एकच गोष्ट सांगतो कि जेवढे कष्ट जेवढा अभ्यास तुम्हाला MPSC पास होण्यासाठी करावा लागणार आहे
तेवढ्या अभ्यासात तुम्ही तुमच्या स्वत:च्या क्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठे करिअर करु शकता. जिथे यशाची खात्री नाही आणि जिथे कष्ट करण्यासाठी मर्यादा नाही अशा या MPSC क्षेत्रामध्ये पैसा आणि वेळ वाया घालवण्यापेक्षा आपल्या आपल्या क्षेत्राला थोडासा वेळ दया इंजिनिअर असाल तर आपल्या फिल्ड चा एक वर्ष चांगला अभ्यास करा तुम्हाला नक्कीच चांगला जॉब मिळेल.

स्पर्धा परीक्षा सोप्या नसतात त्यांचा अभ्यास सुद्धा खूप आहे तेवढा अभ्यास जर तुम्हाला जमणारच नसेल किंवा झेपनारच नसेल तर मग उगाच एक एक वर्ष का वाया घालवायचे ?
सर्व बाजूंचा विचार करून , स्वताच्या अभ्यासाच्या क्षमता तपासून MPSC च्या वाटेवर जायला काही हरकत नाही . परंतु मी खूप असे विद्यार्थी बघितले आहेत जे स्वतःला न तपासता पुणे मुंबई कडे जातात आणि मग एकही पूर्वपरीक्षा पास न होता तीन चार वर्षांनी रिकाम्या हातानी परत येतात .
मागच्या २/३ वर्षात विद्यार्थ्यांना या क्षेत्राची हि बाजू सांगत असतानाच हा विचार आला कि चुकीचे MPSC क्लास्सेस करु नका अस सांगून जमणार नाही किंवा स्वबळावर अभ्यास करून प्रयत्न करा ,घरी बसून MPSC पास होऊ शकता हे कितीही पटवून सांगितल तरी काही विद्यार्थ्यांना अभ्यास विषयांच ज्ञान निट झालेलेच नसते आणि त्यासाठी मग क्लास चा पर्याय ते निवडतात .

इंटरनेट वरून अभ्यास करून पण तुम्ही MPSC पास होऊ शकता अस सांगत असताना इंटरनेट वर सुद्धा चांगल परिपूर्ण मार्गदर्शन तेवढ उपलब्ध नाही हि खंत मनात होतीच . या सर्व गोष्टीसाठी एक परिपूर्ण पर्याय तयार करावा असे ठरवले आणि कामाला लागलो .

मागच्या काही दिवसात खूप विद्यार्थ्यांनी संवाद साधला आणि फीस बद्दल विचारणा केली .काही विद्यार्थ्यांनी स्वतःहून सांगितल कि अशा क्लास साठी २० हजार पर्यंत फीस असली तरी आम्हाला चालेल . परंतु सर्व बाजूने विचार करूनच आम्ही फीस ची रक्कम कमी केली आहे . शिक्षण सेवा पुरवायला खर्च येतो पण तो व्यवसाय समजून त्यातून नफा कमवायचा विचार केला कि फीस अवाढव्य वाढते . आणि याचा फटका मग सर्व विद्यार्थ्यांना बसतो . कोणताही MPSC क्लास चालवण्यासाठी DIAC app माध्यमातून नफा कमावणे हा मुळ हेतू नसल्यामुळे इथे Lectures च्या योग्यतेवर खूप मेहनत घेतली गेली आहे आणि प्रती दिवस १५ रुपये किंवा प्रती विषय 600 रुपये पेक्षा जास्त खर्च तुमचा इथे होणार नाही अशी काहीशी फीस ची रचना केली गेली आहे. तसेच सर्वसाधारण विद्यार्थ्याला MPSC पास होण्यासाठी ३ ते ४ वर्ष कालावधी लागतो त्यामुळे मग ३ ते ४ वर्ष क्लास त्याच्या सोबत असेल तर त्याला आणखी मदत होईल या विचाराने पुढे अर्ध्या फीस मध्ये एक वर्षासाठी पुन्हा प्रवेश दिला जातो आहे .

या लेखाच्या माध्यमातून मी सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो कि तुम्ही फक्त आता अभ्यासाची तयारी दाखवा कष्ट करायची तयारी दाखवा
घरापासून कुठे दूर जायची गरज नाही .आहात तिथे बसून MPSC ची तयारी करा आम्ही आहोत तुमच्या सोबत .आणि हे करत असतानाच पुढे आयुष्यात जर MPSC पास नाही होऊ शकलात , तर कुठे करिअर करता येईल याची एका एका फिल्ड नुसार संपूर्ण माहिती मी तुम्हाला पुढच्या काही काळात देणार आहे .
DIAC हे आमचे स्वप्न आम्ही पूर्ण केलेय.
एक परिपूर्ण उच्च दर्जाचा मार्गदर्शक तुम्हाला तुमच्या घरापर्यंत आणून दिला आहे .
.. आमच्या LECTURES बद्दल त्यांच्या योग्यतेबद्दल तुम्ही कोणत्याही वरिष्ठ विद्यार्थ्याला विचारू शकता . त्यांना हे Lectures पाहायला सांगा आणि विचार याची योग्यता काय आहे ? आणि अभ्यासामध्ये याचा किती चांगला फायदा होऊ शकतो ?
आता जबाबदारी तुमची आहे . तुम्ही DIAC चा एक भाग बनून आपल्या अभ्यासाला एक चांगली गती देऊ शकता.
विद्यार्थी ते अधिकारी या प्रवासात DIAC नेहमी तुमच्या सोबत असेल !!
………………………….
संचालक
अतुल पाटील
D.I.A.C.