विद्यार्थी ते अधिकारी प्रवासात DIAC कडून होणारी मदत
मित्रांनो तुम्ही MPSC करायचा निर्णय सर्व विचार करून घेतला असेलच . आणि तुमच्या हे सुद्धा आता लक्षात आले असेल कि या सर्व MPSC क्लास च्या नावाखाली बाजारामध्ये जो काही प्रकार सुरु आहे त्यातून विद्यार्थ्यांचे खूप आर्थिक नुकसान केले जात आहे .सर्व ठिकाणी जाहिरात बाजी ला उधान आले असून बऱ्याच ठिकाणी खोट्या जाहिराती करून विद्यार्थ्यांना या बाजूला वळवले जात आहे . या सर्व प्रकारातून स्वतःला वाचवून , तुम्ही DIAC मध्ये सहभागी होण्याचा निर्णय केला आहे त्याबद्दल तुमचे अभिनंदन.
तुम्हाला योग्य शिक्षण पुरवणे, तुमच्या अभ्यासातील सर्व समस्या सोडवणे, तुम्हाला सर्व विषय चांगल्या प्रकारे समजावून सांगणे हि आता आमची जबाबदारी आहे . जसे कि डेमो लेक्चर्स मध्ये तुम्ही पाहिलं असेल , आम्ही शिकवण्यासाठी Animations चा वापर करतो. ज्यामुळे अभ्यासातील काही असे घटक जे समजायला कठीण असतात ते एकदम सोपे होऊन जातात आणि इतकच नव्हे तर तुम्हाला माहिती असेल कि , ज्या गोष्टी आपण चित्र स्वरुपात बघून शिकतो त्या कायमस्वरूपी आपल्या डोक्यात राहतात आणि यामुळेच अभ्यासातील हे घटक तुम्हाला परीक्षेमध्ये सहज आठवतील आणि तुम्ही सहजपणे उत्तरे देऊ शकाल .
संपूर्ण भारतात एकमेव DIAC मध्ये स्पर्धा परिक्षांसाठी अशा प्रकारची शिक्षण पद्धत उपलब्ध केलेली आहे . एक महाराष्ट्रीयन म्हणून आम्हाला याचा आणखी अभिमान आहे . स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्रातून खूप स्वातंत्र्य चळवळी राबवल्या गेल्या आणि आज महागड्या शिक्षण पद्धतीच्या विळख्यातून विद्यार्थ्यांना सोडवायला एका परिपूर्ण डिजिटल चळवळी गरज होती आणि DIAC च्या रूपाने हि सुरुवात महाराष्ट्रातूनच झाली आहे हळू हळू हि चळवळ देशभर पोहचेल आणि शिक्षण पद्धतीचे संपूर्ण Digitalisation होईल यात शंका नाही .
Diac मध्ये सर्वात आधी तुम्हाला परीक्षेचा सर्व अभ्यासक्रम आणि पद्धत समजावली जाते. यामध्ये प्रश्नपत्रिका विश्लेषण ( Previous years Question Paper analysis ) कसे करायचे हे सुद्धा सांगितले जाते . कोणत्या घटकावर कसे प्रश्न येतात आणि अभ्यास करताना विषय कशा पद्धतीने अभ्यासाला पाहिजे हे शिकवले जाते .
Diac मध्ये तुम्हाला सर्व विषयांचे शिक्षण मिळेल यामध्ये तुम्ही कोणतेही Lecture कितीही वेळा पाहू शकता तुम्हाला त्यासाठी वेगळे पैसे द्यायची गरज नाही. सर्वसाधारण तुम्हाला प्रती दिवस १५ रुपये पेक्षा कमी खर्चात आम्ही हे शिक्षण उपलब्ध करून देतो आहोत त्यामुळे तुमचे आता एवढच काम आहे कि तुम्ही सर्व विषय निट समजून घेणे आणि त्यांचा चांगला अभ्यास करणे . तसेच इथे तुम्हाला LIVE TEST सुद्धा उपलब्ध करून देतो ज्यामुळे तुम्हाला तुमचा अभ्यास किती झाला आहे याची तपासणी करत येईल आणि जे काही कमकुवत घटक असतील त्याची तयारी चांगली करता येईल .
तुमच्या काही शंका असतील तर तुम्हाला तुमच्या शिक्षकासोबत संपर्क करण्याची देखील मुभा आहे . तुम्हाला अभ्यासाशी निगडीत काही अडचण असेल तर तुम्ही शिक्षकांना फोन वरती बोलू शकता तुमच्या सर्व अडचणी ते सोडवून देतील .
Diac मध्ये फक्त MPSC च मार्गदर्शन मिळते असे नाही तर तुम्हाला इतर क्षेत्रामध्ये सुद्धा काय करिअर तुम्ही करु शकता याचे सुद्धा मार्गदर्शन केले जाते. तुमचा प्लान “B” तयार करण्यासाठी आमच्याकडून मदत केली जाते ज्यामुळे तुम्ही इतर विद्यार्थ्यां सारख अंधळेपणाने या क्षेत्रात वावरणार नाही . आणि स्पर्धा कितीही झाली तरी त्याचा तुम्हाला फटका बसणार नाही .
तुमच्या स्वप्नांना नुसते पंखच नाही तर त्यांना बळकट करण्यासाठी ची मदत सुद्धा करणार .
तुम्ही फक्त उंच भरारी घेण्याचे धाडस दाखवा .
यशाच्या शिखरावर आम्ही तुम्हाला नक्कीच घेऊन जाणार .
चला अभ्यासाला सुरुवात करूया